10.7 C
New York
Thursday, May 22, 2025

Buy now

spot_img

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची नावे समोर; परळीतून धनंजय मुंडे, माजलगाव जयसिंह सोळुंके; बीड , आष्टी, गेवराई, केजचा तिढा कायम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

.

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांनाच उमेदवारांच्या नावांची उत्सुकता आहे. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून पुढील 2 ते 3 दिवसांत जागावाटप जाहीर होईल,

दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गट पक्षाची संभाव्य उमेदवारांची नावे समोर; परळीतून धनंजय मुंडे, माजलगाव जयसिंह सोळुंके यांची उमेदवारी निश्चित झाली असून, बीड , आष्टी, गेवराई, केजचा तिढा कायम आहे.  आष्टीची राष्ट्रवादीची जागा गेवराईला आणि भाजपला आष्टीची अशी अदलाबदली झाली असल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

 

बारामतीतून कोण लढणार?

 

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे निवडणूक लढणार की नाही, तसेच बारामतीमधून अजित पवार दुसरा उमेदवार देणार का? अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य यादी समोर आली असून अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार असल्याचे दिसून येत आहे.

 

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची नावे समोर

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विधानसभा उमेदवार आणि त्यांच्या मतदारसंघाची नावे समोर आली आहेत. यामध्ये अजित पवार हे बारामतीमधून उमेदवार आहेत. तर, नवाब मलिक यांनाही शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राजकीय संन्यास घेणार असल्याचे सांगणारे आमदार प्रदीप सोळुके यांच्या माजलगाव मतदारसंघात त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव समोर आले. त्यामुळे, यंदा माजलगाव मतदारसंघातून जयसिंह सोळंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील.

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 संभाव्य उमेदवार

 

1.अजित पवार – बारामती

2. छगन भुजबळ – येवला

3. हसन मुश्रीफ-कागल

4. धनंजय मुंडे – परळी

5. नरहरी झिरवाळ – दिंडोरी

6. अनिल पाटील – अमळनेर

7.राजू कारेमोरे – तुमसर

8. मनोहर चंद्रीकापुरे – अर्जुनी मोरगाव

9. धर्मरावबाबा आत्राम – अहेरी

10.इंद्रनील नाईक – पुसद

11. चंद्रकांत नवघरे – वसमत

12. नितीन पवार – कळवण

13. माणिकराव कोकाटे – सिन्नर

14. दिलीप बनकर – निफाड

15. सरोज अहिरे – देवळाली

16. दौलत दरोडा – शहापूर

17. अदिती तटकरे – श्रीवर्धन

18. संजय बनसोडे – उदगीर

19. अतुल बेनके – जुन्नर

20. दिलीप वळसे पाटील – आंबेगाव

21. दिलीप मोहिते – खेड – आळंदी

22. दत्तात्रय भरणे – इंदापूर

23. यशवंत माने – मोहोळ

24. सुनिल शेळके – मावळ

25. मकरंद पाटील – वाई

26. शेखर निकम – चिपळूण

27. अण्णा बनसोडे – पिंपरी

28. सुनिल टिंगरे – वडगाव शेरी

29. राजेश पाटील – चंदगड

30. चेतन तुपे – हडपसर

31. किरण लहामटे – अकोले

32. संजय शिंदे – करमाळा

33. देवेंद्र भुयार – मोर्शी

34. आशुतोष काळे – कोपरगाव

35 संग्राम जगताप – अहमदनगर शहर

36. जयसिंह सोळंके – माजलगाव

37. बाबासाहेब पाटील – अहमदपूर

38. सना मलिक – अणुशक्तीनगर

39. नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द

40. अमरावती शहर – सुलभा खोडके

41.इगतपुरी – हिरामण खोसकर

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles