34.1 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img

दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या नातवाचं लॉन्चिंग ?; पंकजा मुंडेंनी लाडक्या लेकाची करून दिली ओळख.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंडे परिवाराची दसरा मेळाव्याची परंपरा गेले अनेक वर्ष सुरू आहे. आधी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे तर आता पंकडा मुंडे या दसरा मेळावा घेऊन आपल्या समर्थकांना संबोधित करतात. आजही असाच दुसरा मेळावा भगवान गडावर संपन्न झाला.मात्र यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो पंकजा मुंडे यांचा लेक म्हणजेच आर्यमन पालवे…

 

मुंडे बंधू भगिनी एकत्र

 

आजचा दसरा मेळावा हा अनेक गोष्टींसाठी खास ठरला. मंत्री धनंजय मुंडे आपल्या बहिणी बरोबर तब्बल बारा वर्षांनी या मेळाव्यात दिसले. धनु भाऊ आल्याने हा मेळावा विशेष गाजला. मात्र यावेळी भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांनी आपल्या मुलाची ओळख उपस्थितांना करून दिली. त्यामुळे दसरा मेळाव्यातून पंकजांनी मुलाला लॉन्च केल्याची चर्चा रंगली आहे.‌

 

‘माझा हा पोरगा..

 

पंकजा मुंडे या भाषणासाठी उभ्या राहिल्या. तेवढ्यात त्यांनी मुलाला पुढे बोलावलं आणि त्याची ओळख करून दिली. “हा माझा मुलगा आर्यमन.. फार गोड आहे. माझ्यापेक्षा फार उंचही आहे. आणि हा यंदा भगवान बाबांच्या दर्शनासाठी गडावर आलाय”, असं त्या म्हणाल्या. त्यावर समर्थकांनी जोरदार टाळ्या वाजवत आर्यमनचं स्वागत केलं.

 

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘माझा हा पोरगा आर्यमन मला फार प्रिय आहे, असे तुम्हाला वाटत असेल. पण त्याच्यापेक्षाही मला तुम्ही सगळे प्रिय आहात. कारण, माझ्या वडिलांनी म्हणजेच मुंडे साहेबांनी जाताना तुम्हा सगळ्या

 

लेकरांना माझ्या पदरात टाकलंय. तुमचे कल्याण झाल्याशिवाय मी शेवटचा श्वास घेणार नाही. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला, त्यावेळी पाच लेकरांनी माझ्यासाठी जीव दिला. त्यामुळे मी माझ्या लेकरांपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करते. मला बाकी काही नको.’

 

मात्र पंकजा मुंडे यांनी आज अचानक आपल्या मुलाला स्टेजवर बोलावून सगळ्यां समोर ओळख करून दिल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला राजकीय कारकीर्दीसाठी लॉन्च केल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles