17.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

इच्छुकांचं हमीपत्र, पक्षातील संभाव्य बंडाळीवर शरद पवारांचे जालीम इलाज शोधला!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत संभाव्य बंडाळीवर लगाम लावण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाने जालीम उपाय शोधलाय. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांकडून बंडखोरी न करण्याचं हमीपत्र लिहून घेण्यास सुरुवात केलीय.त्यामुळे उमेदवारीसाठी कुंपनावर असलेल्या इच्छुकांची मात्र चांगलीच कोंडी होणार आहे.

 

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर इकडं इच्छुकांनीही उमेदवारीसाठी लॉबिंग सुरु केलं आहे. शरद पवारांचा पक्षही त्याला अपवाद नाही. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील बहुतेक नेते अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. निवडणुकीत तिकीट नाकारल्यास अनेकजण बंडखोरी करतात. ती संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हमीपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे.

 

हमीपत्रात नेमकं काय लिहिलंय?

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढणार नाही. तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देईल. पक्षाच्या सक्षम पदाधिकाऱ्याने आदेश दिल्यास तत्काळ पदाचा राजीनामा देईल, अशी हमी इच्छुकांकडून लिहून घेतली जात आहे. पण आता त्या हमीपत्रावर सत्ताधाऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केलीय.

 

 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा ओढा वाढला, बंडखोरी रोखण्यासाठी मुरब्बी शरद पवारांनी उपाय शोधून काढला

 

वर्षभरापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं. त्यामुळे पक्षात उभी फूट पडली. पक्षातील बड्या नेत्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. पण अजित पवारांच्या बंडानंतरही शरद पवारांनी लोकसभेत लक्षवेधी कामगिरी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. पण संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी मुरब्बी शरद पवारांनी हमीपत्राचा उपाय शोधून काढला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles