19.1 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

नगर- बीड परळी रेल्वे मार्ग डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्रामध्ये अनेक पायाभूत प्रकल्प जसे की रस्ते प्रकल्प व रेल्वे प्रकल्पाची कामे सध्या सुरू आहेत. एवढेच नाही तर नुकतेच मनमाड ते इंदोर आणि बारामती ते फलटण या नवीन रेल्वे मार्गांना देखील आता मंजुरी देण्यात आलेली असून या रेल्वेमार्गांचे काम देखील आता लवकरात लवकर सुरू होण्याची एक अपेक्षा आहे. देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अशा प्रकारचे रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

रेल्वे प्रकल्पांच्या अनुषंगाने पाहिले तर नगर ते बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारी नगर- बीड-परळी या महत्त्वाच्या अशा रेल्वे मार्गाचे 132.92 किमी अंतराचे काम पूर्ण झालेले आहे व हा एकूण रेल्वेमार्ग २६१.२५ किलोमीटरचा आहे. या रेल्वे मार्गाचे काम आता वेगात सुरू असून लवकरात लवकर हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेस दाखल होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.

 

डिसेंबर 2025 पासून या लोहमार्गावर पूर्ण क्षमतेने धावणार रेल्वे

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील अहमदनगर आणि बीड या दोन महत्त्वपूर्ण जिल्ह्यांमधील कनेक्टव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नगर- बीड- परळी या रेल्वे मार्गाचे 132.92 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झालेले असून हा रेल्वे मार्ग एकूण 261.25 किलोमीटर लांबीचा आहे.

साधारणपणे 25 डिसेंबर 2025 पर्यंत हा लोहमार्ग पूर्ण करण्याचे रेल्वेच्या माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आले असून डिसेंबर 2025 पासून या लोहमार्गावर पूर्ण क्षमतेने रेल्वे धावणार आहे. हा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून या रेल्वे मार्गावर असणाऱ्या परळी रेल्वे स्टेशन वरूनच जे प्रवासी दक्षिणेकडे जातील किंवा येतील अशा प्रवाशांना थेट याच नगर- बीड- परळी रेल्वे स्थानकातून मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाणे देखील शक्य होणार आहे.

 

साधारणपणे गेल्या सात वर्षाच्या कालावधीपासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू होते. या रेल्वेमार्गाच्या निमित्ताने या परिसरामध्ये प्रथमच रेल्वे मार्गाचे आगमन झालेले आहे. या रेल्वे मार्गावर नगर ते नारायणगाव, नारायणगाव ते सोलापूर वाडी व सोलापूर वाडी ते आष्टी आणि आष्टी ते अमळनेर दरम्यान चाचण्या घेण्यात आलेल्या होत्या.

 

यामध्ये ऑगस्ट महिन्यात अमळनेर ते विघनवाडी दरम्यान ताशी 130 किलोमीटर वेगाने चाचणी घेण्यात आलेली होती. साधारणपणे घेण्यात आलेल्या चाचण्या बघितल्या तर 95 किलोमीटर अंतरावरील चाचण्या पूर्ण करण्यात आलेले आहेत. व संपूर्ण 132 किलोमीटर अंतराचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले आहे. या रेल्वे मार्गाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या परळी रेल्वे स्थानकातून बीड आणि नगर मार्गे मुंबई व पुणे थेट रेल्वे सुरू होणार आहे.

 

या ठिकाणच्या प्रवाशांना या रेल्वेमार्गे जाता येईल मुंबई आणि पुण्याला

 

या रेल्वे मार्गावर असणाऱ्या परळी स्थानकातून नांदेड तसेच हैदराबाद, छत्रपती संभाजी नगर, बेंगलोर, तिरुपती, सिकंदराबाद, बिदर, गुंटूर आणि लातूर या ठिकाणच्या प्रवाशांना या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्याला जाणे शक्य होणार आहे. या रेल्वे मार्गावर पाचशे मीटर लांबीचे 18 मीटर उंचीचे नऊ पूल उभारण्यात आलेले आहेत.

 

नगर ते बीड लोहमार्ग होणार नोव्हेंबरपर्यंत पूर्ण

 

यासोबतच अहमदनगर ते बीड हा जो काही तीस किलोमीटर रेल्वेमार्ग आहे तो नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे व त्यासोबतच बीड ते वडवणी हा जो काही 32 किमीचा रेल्वे मार्ग आहे तो मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण नगर- बीड परळी रेल्वे मार्ग डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles