अद्याप केंद्र शासनाची मान्यता नाही, जनतेची माफी मागा-सुरेश धस यांचा पलटवार
आष्टी । प्रतिनिधी
आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागला 9 सब स्टेशन्स आणि668 ट्रांसफार्मर मंजूर केल्याचा आव आ.बाळासाहेब आजबे यांनी आणला ही जनतेची शुद्ध फसवणूक आणि दिशाभूल असून आपण कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांचेकडे प्रस्ताव सादर केला आहे त्याचे पत्र दि. 11नोव्हेबर 2023 रोजी दिलेले आहे आणि त्याचा पाठपुरावा केलेला आहे मात्र जी योजना अद्याप केंद्र शासनाने मंजूर केलेली नाही केवळ त्याचे बुकलेट मधील नावे वाचून मंजुरीच्या बातम्या दिल्यामुळे मला त्यांच्या बुद्धीची किंवा येते त्यांनी जनतेचे माफी मागावी असा पलटवार माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, दि.2 ऑगस्ट 2024 रोजी आष्टी मतदार संघाचे आमदारांनी 9 वीज सबस्टेशन्स आणि 668 ट्रान्सफॉर्मर्स मंजूर करून विजेचा प्रश्न सोडवला अशा बातम्या आणि वर्तमानपत्रात जाहिराती देऊन आणि सोशल मीडियावर बातम्या पसरवून..सत्कार करून घेऊन स्वतःची बडवून घेतली आहे.. हे सर्व पाहता मला त्यांच्या बुद्धीची कीव येते.. हे म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी त्यांची अवस्था झाल्याची दिसून येते. आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील विजेचा गंभीर प्रश्न पाहता आपण सुधारित वितरण क्षेत्र योजना (आर डी एस एस) अंतर्गत या सर्व कामांना मंजुरी मिळावी यासाठी आपण प्रस्ताव दाखल करून त्यासाठी पत्र दिलेले आहे यामध्ये काही कच्चा आराखडा होता त्यामध्ये काही बदल आवश्यक होते.दादेगाव, पारोडी, बीडसांगवी, मातकुळी, कोयाळ, जामगाव, अंभोरा, पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका, पारगाव घुमरा सौताडा,शिरूर कासार तालुक्यातील शिरूर कासार इतकेच नक्की होतील एवढे मी सुचवले होते त्यापैकी दादेगाव हे पूर्वीच्याच महावितरण योजनेत मंजूर होते मात्र जागे अभावी ते राहिले होते पारगाव घुमरा या ठिकाणच्या शेतकर्यांना सन 2014 सालीच भूसंपादनाचे पैसे दिलेले आहेत या 9 वीज उपकेंद्रांचा प्रस्ताव पुढे पाठवला तसेच सद्यस्थितीमध्ये 5 एम व्ही ए क्षमतेच्या पावर ट्रांसफार्मर सह आणखी 5 ट्रांसफार्मर आष्टी, पोखरी, शिराळ, धानोरा, दौलावडगाव, टाकळी अमिया पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी आणि शिरूर तालुक्यासाठी फिडरवे तयार करणे यासह सद्यस्थितीत175 ठिकाणी 63 क्षमतेच्या ऐवजी 100 क्षमतेचे ट्रांसफार्मर बसवणे 33/11 सब स्टेशन साठी एकूण 38 किलोमीटर वीज वाहिनी तयार करणे, या कामांसाठी कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे मात्र विद्यमान आमदारांनी कशाचीही शहानिशा करतात केवळ आमदारांना देण्यात येणार्या बुकलेटमध्ये नावे वाचली आणि मंजुरी मिळाल्या बाबतच्या बातम्या दिल्या आणि जाहिराती प्रसिद्ध करून स्वतःचीच बडवून घेतली.
वास्तविक पाहता सुधारित वितरण केंद्र योजना (आर डी एस एस ) अंतर्गत आधुनिकीकरण या विभागात नवीन उपकेंद्र क्षमता वाढ या योजनेस केंद्र शासनाची अद्यापही मंजुरी मिळालेली नाहीङ्ग आमदार महोदयांनी 19 जुलै 2023 रोजी निविदा प्रसिद्ध झालेल्या महावितरण कंपनीने फेज वन ही योजना त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निविदे मध्ये वाचावी आमदार महोदयांनी धडधडीत चुकीचे स्टेटमेंट केले आहे छत्रपती संभाजी नगर रिजन मधील लातूर अंतर्गत बीड लातूर आणि धाराशिव हे विभाग आहेत त्यामध्ये लातूर धाराशिव सोडता बीड जिल्ह्यातील एकही काम मंजूर नाही त्यामुळे आमदारांनी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल आणि फसवेगिरी करू नये त्यांनी गोरगरीब जनतेची माफी मागावी अशी आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.