4.6 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

लाल दिव्याची हौस नडली; पूजा खेडकरचं आय ए एस पद रद्द; परीक्षा देण्यावर आजीवन बंदी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्यावर UPSC ने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. पूजा खेडकरला UPSCनं दोषी ठरवलंय. त्याचबरोबर पूजा खेडकरचं प्रशिक्षणार्थी पद ताप्तुरतं रद्द करण्यात आलं असून तिच्यावर UPSC परीक्षा देण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे, खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावून मिरवणाऱ्या आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अरेरावी करणाऱ्या पूजा खेडकर आणि कुटुंबीयांना 440 व्होल्टचा मोठा झटका बसलाय. पूजा खेडकर यांना तिची बाजू मांडण्यासाठीही मुदत देण्यात आली आहे. तर फक्त पूजा खेडकरांवर कारवाई न होता, त्यांना मदत केलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीये.

 

पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल

बोगस कागदपत्रांच्या आधारे फ्रॉड केल्याबद्दल केंद्रीय लोकसेवा आयोगानं (Central Public Service Commission) याआधीच पूजा खेडकरविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी पूजा खेडकरनं दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. बुधवारी कोर्टात याबाबतची सुनावणी झाली तेव्हा त्यांच्या वकिलांनी असे काही युक्तिवाद केले की, या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. पूजा खेडकर फ्रॉड नाही, तर फायटर आहे, असा दावा तिचे वकील अॅड. माधवन यांनी केला

 

पूजा खेडकर यांच्यावरचे आरोप

आरोप क्र. 1

पूजा खेडकरनं खोटं वैद्यकीय दिव्यांग प्रमाणपत्र दिलं? असा आरोप आहे. पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं होतं. विशेष म्हणजे अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालय तसंच पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालय अशा दोन ठिकाणहून त्यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवली होती. पुणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून देखील त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देता येणार नाही असं जिल्हा रुग्णालयाकडून स्पष्टपणे कळवण्यात आलं. युपीएससीमध्ये निवड झाल्यानंतर दिव्यांगत्वाची पडताळणी करण्यासाठी दिल्लीतील एम्समध्ये वैद्यकीय तपासणी करवून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करवून घेतली नाही

 

आरोप क्र. 2

UPSC ला फसवण्यासाठी पूजा खेडकरनं वारंवार नावं बदलली. केवळ पूजाच नाही, तर तिच्या आईवडिलांचीही नावं वारंवार बदलण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर आहे. 2019 ला युपीएससी परीक्षा दिली, तेव्हा यादीमध्ये त्यांचं नाव खेडेकर पूजा दिलीपराव असं आहे. शिवाय आडनावाने सुरुवात आहे. त्याचप्रमाणे दिलीपराव या नावात इंग्रजी स्पेलिंग Deeliprao असं लिहिण्यात आलं आहे. 2021 ची यादी पाहिल्यास त्यात त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे. म्हणजे आडनाव शेवटी आहे. वडिलांच्या नावाआधी आईच म्हणजेच मनोरमा नाव आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे वडिलांच्या नावाची स्पेलिंग dilip लिहिण्यात आली आहे. तर पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी इथं असलेल्या 14 गुंठे जमिनीच्या सातबारातील आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे. दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे.

 

आरोप क्र. 3

पूजा खेडकरनं फ्रॉड केला, कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त असतानाही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केलं, असा आरोप तिच्यावर आहे. पूजा खेडकर यांचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी घटस्फोट घेतल्याचं सांगितलं गेलं. मात्र या दोघांचा खरंच घटस्फोट झाला होता की त्यांनी लेकीच्या फायद्यासाठी घटस्फोटाचा बनाव केला होता याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत. पूजा खेडकर यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी हे सारं करण्यात आल्याचं समजतं. पूजा यांचे आईवडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यामध्ये घटस्फोट झाल्याचे कागदोपत्री दाखवून नॉन क्रिमीलयर सर्टिफिकेट मिळवण्यात आलं.

 

आरोप क्र. 4

पूजा खेडकरनं निर्धारित संख्येपेक्षा अधिकवेळा UPSC परीक्षा दिली. IAS यादीत येण्यासाठी अपंगत्वाची श्रेणी बदलली, असाही आरोप तिच्यावर आहे. पूजा खेडकरांनी अनेकवेळा परीक्षा दिली, जे युपीएससीच्या नियमात बसत नाही. ओळखपत्र बदलून आणि आई वडीलांचे आणि स्वतःचे नाव बदलून परीक्षा दिल्या. ई-मेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली होती. युपीएससीकडून सखोल चौकशी करण्यात आली. ओबीसी उमेदवाराला नऊ वेळा परीक्षा देता येते. पूजा खेडकरांनी त्यापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिली. त्यासाठी नावात बदल केला, ओळख पत्रावरील फोटो तसंच सही देखील बदलली

 

आरोप क्र. 5

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर आणि तिच्या वडिलांनी अरेरावी केली. वरिष्ठ अधिकाऱ्याचं केबिन बेकायदेशीरपणे बळकावलं, असा आरोप केला जातोय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रूज झाल्या. मात्र अवघ्या काही दिवसांतच ऑडीवाल्या कलेक्टरीण म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. कारण ऑडीसारखी महागडी खासगी गाडी त्या सरकारी कामासाठी वापरत होत्या. या ऑडीवर महाराष्ट्र शासन असं स्पष्टपणं लिहिलेलं होतं. पुण्यात रूजू होण्यापूर्वीच त्यांनी कार, निवासस्थान आणि शिपाई अशा सोयीसुविधांची मागणी केली. इतकंच नाही तर वॉशरूम अटॅच नसल्यानं त्यांना देण्यात आलेला स्वतंत्र कक्ष त्यांनी नाकारला. परवानगी न घेता खेडकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अँटी चेंबरचा ताबा घेतला. स्वतःच्या खासगी ऑडी कारवर अंबर रंगाचा दिवा लावला.

 

आता पूजा खेडकरला बेल होणार की जेल, याचा फैसला गुरूवारी दुपारी पटियाला हाऊस कोर्ट देणाराय. मात्र त्याआधीच तिचं प्रशिक्षणार्थी पद रद्द करून केंद्रीय लोकसेवा आयोगानं तिचे आयएएस होण्याचे मनसुबे धुळीला मिळवलेत. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे यंत्रणेतील तरतुदींचा गैरफायदा घेत एका प्रामाणिक उमेदवाराची संधी पूजा खेडकरनं हिरावून घेतली. मात्र तिच्यावर कारवाई करून केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपली चूक सुधारलीय.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles