-3.5 C
New York
Thursday, January 9, 2025

Buy now

spot_img

गेवराई तालुक्यात गारांचा पाऊस ; शेतातील पिकांचे नुकसान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गेवराई |

तालुक्यातील बंगाली-पिंपळा, कवडगांव, सुशी, वडगाव, चिखली, कोळगाव,गढी पाडळसिंगी, मादळमोही, धोंडराई, उमापूर, कुंभेजळगाव, तलवाडा सह तालुक्यातील अनेक गावातील परिसरात सोमवारी (दि.३) सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होवून काही ठिकाणी तुफान गारपीट झाली. यामुळे रब्बी हंगामातील टरबूज, खरबूज, गहु, हरभरा, मका, ज्वारीसह पालेभाज्या तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले.

गेवराई तालुक्यात सोमवार दि.६ मार्च होळीच्या दिवशी सायंकाळी बंगालीपिंपळा, कवडगांव, सुशी, वडगाव, चिखली, कोळगाव,गढी पाडळसिंगी, मादळमोही, धोंडराई, उमापूर, कुंभेजळगाव या परिसरात गारा पडल्या पडलेल्या गाराने शेतात, घरावरील छत तसेच रस्त्यावर गारांचा खच साचला होता.तर तालुक्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. अनेक ठिकाणी घराचेही नुकसान झाले असून यामुळे अचानक झालेल्या गारांच्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची दाणादाण उडाली होती. दरम्यान या अवकाळी व गारपीटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तरी महसूल प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles