21.7 C
New York
Thursday, June 19, 2025

Buy now

spot_img

पंकजा मुंडे खासदार होणार? भाजपमध्ये हालचाली सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लोकसभा निवडणुकी बीड मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना संसदेत पाठवण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत. राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेत पाठवण्यात यावे, अशी मागणी भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचा चेहरा आहे. त्यांना राज्यसभेवर पाठवा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभेला पराभव, राज्यसभेवर वर्णी?

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. या पराभवानंतर काही जणांनी आत्महत्याही केल्या.

ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणूक… राजकीय बेरीज काय?

लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही. सामाजिक गणितांचाही फटका बसल्याची चर्चा आहे. आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने नाराज झालेल्या सामाजिक घटनांना परत आणण्यावर मंथन सुरू केले आहे.

राज्यसभेच्या जागा रिक्त

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची जागा रिक्त होणार आहे. उदयनराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून निवडून आले आहे, तीही एक जागा रिक्त होत आहे. पीयूष गोयल यांचीही जागा रिक्त झाली आहे. या तिन्ही जागा भाजपच्या आहेत, मात्र एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाऊ शकते.सातारा लोकसभेच्या जागेच्या बदल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे भोसले लोकसभेवर गेल्यास त्यांची जागा मागितली होती. त्याबद्दल काय निर्णय होणार, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दोन जागांपैकी एका जागेवरून पंकजा मुंडेंना राज्यसभेत पाठवले जाऊ शकते.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles