3.6 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

महिला समाज कल्याण अधिकाऱ्यास एक लाखाची लाच घेताना पकडले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सातारा जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करुन १ लाखाची लाच स्विकारताना सातारा येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या सपना सुखदेव घोळवे (वय ४०) या वर्ग एकच्या अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान याच प्रकरणात येथील समाज कल्याण निरीक्षक दिपक भगवान पाटील (वय ३६) याने आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

घटनेची माहिती अशी, तक्रारदार यांच्या संस्थेस शासनातर्फे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांना निवासी शाळेत शिक्षण देण्याकरिता ५९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजुर करण्यात आले होते. याकरिता अनुदानाचा धनादेश देण्यासाठी सहाय्यक संचालक सपना घोळवे हिने दहा टक्के म्हणजे ६ लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. अखेर चर्चेअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दिली.

लाचलुचपत विभागाने बुधवारी समाजकल्याण विभागात सापळा लावला होता. अधिकारी घोळवेंनी तक्रारदाराकडे १ लाख रुपये घेवून येण्यास सांगितले. तर समाज कल्याण निरिक्षक दिपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रम शाळेच्या अनुदानाचे धनादेश काढण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने आणलेली १ लाखाची रक्कम घोळवे हिने स्विकारताना तीला रंगेहात पकडण्यात आले. तर लाचेची मागणी करणाऱ्या निरिक्षक दिपक पाटील यास ताब्यात घेण्यात आले.

लाचलुचपतचे उपाधीक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रतिम चौगुले, सलीम मकानदार, धनंजय खाडे, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव, अनिस वंटमुरे यांचा कारवाई सहभाग होता.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles