34.1 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img

पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

आगोदर उशिने तोंड दाबून पत्नीचा खून करण्यात आला, नंतर स्वत: देखील दोरीने गळफास घेऊन पतीने आत्महत्या केली. ही घटना बीड शहरातील वृंदावन कॉलनीत आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज असून पोलिस तपास करत आहेत.राधा वायभट (वय 26) व भागवत वायभट (वय 35 दोघेही रा.लिंबागणेश ता.बीड ह.मु.बीड) अशी मयतांची नावे आहेत.

भागवत हा रिक्षा चालक असून बीडमध्ये किरायाने घर करून कुटूंबासह रहात होता. शनिवारी रात्री तो घरी आला. यावेळी पत्नी आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. यामध्ये त्याने पत्नीला मारहाणही केली. त्यानंतर मध्यरात्रीच डोक्या खाली घेण्याच्या उशिने पत्नीचे तोंड दाबले. यामध्ये गुदमरून राधाचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वत: देखील दरवाजा बाहेर असलेल्या हुकाला दोरीने गळफास घेतला.

सकाळी झोपेतून उठवल्यावर त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलीने हा प्रकार पाहलिे. तीने रडायला सुरूवात केली. त्यामुळे खालच्या मजल्यावरील लोक वरच्या मजल्यावर गेले. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यावर शिवाजीनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते. हा वाद कौटुंबिक कारणावरून झाल्याचे समजत आहे. पोलिस तपास करत असून खरे कारण काय, हे नंतरच समोर येणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles