नवी दिल्ली |
देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असल्याने राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची धाकधूक वाढणार असून, विजयासाठी आता प्रत्येक पक्षाला दिवसरात्र एक करावा लागाणार आहे. आयोगाकडून लोकसभेच्या तारखांसोबत त्या किती टप्प्यात होणार याबाबत अता सर्वांना उत्सुकता लागली असून, या सर्वांचा खुलासा उद्या दुपारी केला जाणार आहे.
लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक उद्या म्हणजेच शनिवारी (16 मार्च 2024) जाहीर केले जाणार असून, निवडणूक आयोग (EC) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये आयोगाकडून लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आणि त्या किती टप्प्यात होतील हे स्पष्ट करणार आहे.