21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अजित पवार यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे; शिवसेना नेते विजय शिवतारेही आव्हान देणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाविकास आघाडीमघ्येही जागा वाटप बाबत बैठका सुरू असून काल खासदार शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवारी जाहीर केली आहे. बारामतीलमध्ये यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना नेते विजय शिवतारेही आव्हान देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

 

एका कार्यक्रमात बोलताना विजय शिवतारे यांनी अजित पवार यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे विजय शिवतारे ही निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू आहेत. एका कार्यक्रमात बोलताना विजय शिवतारे म्हणाले, लोकांसाठी मी अनेकांशी पंगा घेतला. लोकसभेची निवडणूक समोर आहे, सुप्रिया ताई, सुनेत्रा ताई असं सुरू आहे. बारामती लोकसभा हा कोणाचा सातबारा नाही, अशी टीकाही विजय शिवतारे यांनी केली.

 

“बारामतील लोकसभा मतदार संघात पुरंदर, भोरचाही खासदार पाहिजे. आम्ही का म्हणून यांना मतदान दहा, दहा वेळा करायचं. आम्हाला काहीच मिळालं नाही, याच ठिकाणी अजित पवार यांनी विजय शिवतारेंचा अपमान केला होता.आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असं चॅलेजं विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिलं.

 

“या मतदार संघात ६ लाख ८६ हजार मतदान पवारांचा आहे आणि ५ लाख ८० हजार पवार विरोधकांचं मतदान आहे. ६ लाख ८६ हजार मध्ये ते दोघे असतील आणि ५ लाख ८० हजारमध्ये एकटा विजय शिवतारे असेल. ही लढाई आता आर-पारची लढायची असा मी निर्णय घेतला आहे, असंही शिवतारे म्हणाले.

 

“या ठिकाणी येऊन त्यांनी पुरंदरच्या जनतेची माफी मागावी लागेल. पुरंदरच्या विमानतळाचं कधी होणार ते सांगा, माझी लढाई लोकांसाठी आहे. आता सगळ्यांनी एकत्र येऊन यांना पाडलं पाहिजे, असंही शिवतारे म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles