20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

परळीत रेल्वेरुळावर आढळला पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा दोन तुकडे झालेला मृतदेह, पोलीस दलात खळबळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर पुणे येथे सीआयडी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय – 42) यांचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवारी सकाळी दोन तुकडे झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला असून यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी रात्री धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी शनिवारी सकाळी सात वाजता रेल्वेरुळावर एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. ही माहिती मिळताय सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर एका व्यक्तीचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान, मयत व्यक्तीचे नाव सुभाष भीमराव दुधाळ असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याची माहिती मिळालेली नाही. तसेच ते परळी येथे कशासाठी आले होते याचीही मिळालेली नाही.

बीडमधून पुण्यात झाली होती बदली

सुभाष भीमराव दुधाळ हे पुण्यातील सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बीड येथून पुण्यात बदली झाली होती. आता त्यांचा मृतदेहच आढळून आल्याने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही आढळली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles