पाटोदा |
मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी पिंपळगाव धस (ता.पाटोदा) ग्रामपंचायत आणि आगामी सर्व निवडणूकांवर ग्रामस्थांच्या वतीने दि.२५ रोजी बहिष्कार घालण्यात आला.निवडणूकीसाठी जवळपास ४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, सर्वच्या उमदेवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखली जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू आहेत. तर धगनर आरक्षणाचा मुद्दाही तापत आहे. त्यांचेही उपोषणे सुरू आहेत. शिवाय जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी मराठा आरक्षणसाठी निवडणूकीवर बहिष्कार घातलेला आहे.समाजाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी पिंपळगाव धस, महेंद्रवाडी, तगारा, सगळेवाडी येथील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच्या सर्व उमदेवारी अर्ज मागे घेवून बहिष्कार घालत असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. विशेष म्हणजे येथील सरपंचपद हे एसीसाठी राखीव होते. परंतु दोन्ही समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गावातील अठरा-पगड जातीतील बांधवांनी पाठिंबा दर्शवत उमेदवारी अर्ज मागे घेतले.चार गावात अठरा-पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर चारही गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामपंचायतसह आगामी सर्व निवडणूकीवर बहिष्कार असणार आहे.