25.1 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img

शरद पवार यांच्या सभेसाठी बीडमध्ये पूर्वतयारी; आ.संदीप क्षीरसागर घेणार जिल्हाभर नियोजन बैठका

- Advertisement -
बीड |

राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची मोट पुन्हा बांधण्यासाठी कंबर कसली आहे.येवल्यानंतर आता बीडमध्ये 17 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची सभा होणार आहे.आ.संदीप क्षीरसागरांकडून या सभेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाभर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

दि 7 ऑगस्ट रोजी मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैयामध्ये सकाळी 10 वाजता तर सायंकाळी 5 वाजता राजुरी (न.) येथे बैठक आयोजित केली आहे. यानंतर जिल्हाभरात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठक घेतली जाणार आहे. दरम्यान आ.क्षीरसागरांनी चालू केलेल्या या बैठकींच्या सत्रामुळे शरद पवारांच्या सभेला बीड जिल्हावासियांचा तुफान प्रतिसाद मिळणार असल्याचे संकेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात पहिली सभा येवल्यामध्ये झाली. यानंतर प्रकृतीच्या कारणामुळे थांबलेल्या सभा पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून शरद पवार सुरु करणार आहेत. येवल्यानंतर महाराष्ट्रात होणारी ही दुसरीच सभा असल्याने, ही सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी आ.संदीप क्षीरसागर कामाला लागले असून सोमवारी (दि.7) सकाळी 10 वाजता मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैयामध्ये येळंबघाट, नेकनूर, मांजरसुंबा, लिंबागणेश, चौसाळा, बोरखेड, पाली या पंचायत समिती गणातील तर याच दिवशी सायंकाळी 5 वाजता राजुरी (न.) येथे गणपती मंदीर सभागृह याठिकाणी, राजुरी (न.), कामखेडा, चर्हाटा या पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आ.क्षीरसागरांची यंत्रणा जोमाने तयारीला
17 ऑगस्ट रोजी होणार्या खा.शरदचंद्र पवार यांच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. ही सभा ऐतिहासिक व भव्य व्हावी याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांची यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. या बैठकीचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यात बीड, शिरूर -कासार, माजलगाव, आष्टी, पाटोदा, केज, अंबाजोगाई, परळी, धारूर, वडवणी, गेवराई या 11 तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर बैठका घेणार आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles