3.3 C
New York
Monday, November 17, 2025

Buy now

spot_img

’12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा’; हायकोर्टाने सरकारचे टोचले कान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण मागच्या तीन वर्षांपासून खितपत पडलेलं आहे. या प्रकरणी आज पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे.

 

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या बाबतीत एक याचिका नव्याने दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याविषयी आपली भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण प्रकरणाची सुनावणी ही 21 ऑगस्ट रोजी पार पडेल. त्याचबरोबर न्यायालयाने राज्य सरकारला त्यांचं मत 21 तारखेला मत स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची दिलेल्या यादीवर सर्वप्रथम निर्णय व्हावा. त्यानंतर आलेल्या यादीचा विचार केला जावा,असं याचिकाकर्ते सुनिल मोदी यांनी म्हंटलं आहे.

 

जून २०२० पासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं प्रकरण पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाच्या सुनावण्या झालेल्या आहेत. येत्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या कचाट्यात सापडलेलं हे प्रकरण हायकोर्टात आलेलं आहे.

 

या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुभा दिलेली होती. तर दुसरे याचिकाकर्ते सुनिल मोदी यांना हायकोर्टात पुन्हा दाद मागयची असेल तर मागा, असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यानुसार आता सुनिल मोदी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles