19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

` मेरे पास शरद पवार है`- आ. संदीप क्षीरसागर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत भाजप-शिंदे सरकारसोबत गेले. मी मात्र मोठ्या साहेबांसोबतच राहण्याचा निर्धार केला होता.  तेव्हा अनेक आमदारांनी मला फोन करून तुम्ही तिकडे एकटे काय करता, इकडे मंत्रीपद, सत्ता, महामंडळ आहे, तिकडे काय आहे? असा प्रश्न केला होता. तेव्हा त्यांना मी ` मेरे पास शरद पवार है`, असे उत्तर दिल्याचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

 

अजित पवार ३२ आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. बीड जिल्ह्यातून अजित पवारांच्या बंडाला मोठे बळ मिळाले. पण बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र आपण `सदेव मोठ्या साहेबांसोबतच`, अशी भूमिका घेत एकनिष्ठ राहिले. दरम्यान राज्यातील या नाट्यमय घडामोडीनंतर शहरातील राष्ट्रवादी भवन ओस पडले होते. दोन्ही गटाचे नेते इकडे गेल्या आठवडाभरापासून फिरकले नव्हते.

 

आज मात्र आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जे जे (NCP)राष्ट्रवादीला सोडून गेले, त्यांना निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा देखील त्यांनी या मेळाव्यात दिला. आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी सोडून सत्तेत गेलेल्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ. जे झाले ते लोकसभेसाठी केलेलं षडयंत्र असून आता या आमदारांना नोटीस येणार आहेत.

 

आपण काहीही झाले तरी शरद पवारांसोबत असल्याचे सांगत संघर्ष आपल्या रक्तात असून हा संघर्षाचा लढा येणाऱ्या निवडणुकीत प्रामाणिकपणे लढण्याचे आवाहनही क्षीरसागर यांनी उपस्थितांना केले. जेव्हा जेव्हा वेळ आली तेंव्हा आपण राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांसोबत राहण्याची भूमिका घेतली. यावेळीही आपण शरद पवारांसोबतच असल्याचे जाहीर केले. कोणावर टीका करण्यापेक्षा शरद पवारांप्रमाणे आपल्यालाही येणाऱ्या निवडणुकीतून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

 

ज्या प्रमाणे सध्या त्यांना नोटीस आल्या आहेत तशाच यांनाही नोटीस येणार असल्याचे सांगत अजीत पवार गटात गेलेल्यांना टोला लगावला. पक्ष आणि चिन्ह हे आपल्याकडेच राहणार असल्याचे शरद पवारांनी सभेत सांगितले आहे. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, उषा दराडे, अॅड. डी.बी. बागल, वैजीनाथ तांदळे, रामदास हंगे आदी उपस्थित होते. या बैठकीला विविध मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles