18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

‘तक्रार पुन्हा डोक्यावर बसली’, जयंत पाटील यांचा अजित पवार आणि शिंदे गटाला जोरदार टोला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी आज तडाखेबंद भाषण केले. आपल्या भाषणातत्यांनी भाजपसोबत सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गटाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगावला.

आज अनेक लोक आपल्याला सोडून गेले आहेत. जे लोक शरद पवार यांच्या आजूबाजूला मंचावर बसत होते ते आज इतर ठिकाणी गेले आहेत. सत्तेत सहभागी झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सरकार चांगले चालले होते. असे असताना शिंदे गटातील काही लोकांची तक्रार होती. म्हणून त्यांनी सरकार पाडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. गंमत अशी की आता तीच तक्रार त्यांच्या डोक्यावर बसली आहे. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे यायची भाषा बोलू लागले आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

 

आज काही लोकांना अचानक आठवले आहे की, शरद पवार नावाच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. जेव्हा आपण दोन वर्षे तुरुंगात राहून परत आला. तुमचा पुण्यात सत्कार झाला. त्या वेळी तुमच्या डोक्यावर फुलेंची पगडी शरद पवार यांनी घातली. तेव्हा बडवे आड आले नाहीत? उद्धव ठाकरे यांचा फोन आला शिवतीर्थावर शपथ घेण्यासाठी दोन नावे आवश्यक आहेत. ती सांगा. मी साहेबांना विचारले. तेव्हा शरद पवार यांनी पहिले नाव उच्चारले छगन भुजबळ. तेव्हा बडवे आड नाही आले?, असा थेट सवाल उपस्थित करत जयंत पाटील यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले. छगन भुजबळ यांनी शरद पवार नावाच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असा आरोप केला होता.

 

दरम्यान, आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुख पदी निवड केल्याची घोषणा केली. या वेळी जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील बंडखोर गटाला जोरदार चिमटा काढला. आज पक्षातील गर्दी बऱ्यापैकी कमी झाली आहे. त्यामुळे मला जो अधिकार प्राप्त झाला आहे त्यानुसार आपण ही निवड करत आहे. आपण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा स्वाभीमान राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा सांगू, असे जयंत पाटील म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles