20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अन् अखेर दादांच्या मनातलं सगळं ओठावर आले!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शेवटी जे व्हायचं ते झालं आणि नको त्या गोष्टी समोर आल्या. राज्याचे नव्यानं उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत.अजित पवार अशाप्रकारे कधी आपल्या काकांवर पवारांवर इतक्या उद्वेगानं बोलतील असे कुणालाही वाटले नव्हते. पण अखेर दादांच्या मनातलं सगळं ओठावर आल्याचे दिसून आले आहे.

दादांची ओळख ही परखड आणि कुणाचीही भीडभाड न ठेवता ठेवणारा नेता अशी आहे. स्पष्टवक्तेपणा दादांच्या व्यक्तिमत्वाचा खास भाग राहिला आहे. आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हजारो कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. त्यात त्यांचा रोख आपल्या काकांवर अर्थात शरद पवारांवर होता. त्यात त्यांनी गेल्या काही वर्षात शरद पवारांची भूमिका कशी चूकीची होती. आणि त्यांच्या पद्धतीनेच कशाप्रकारे निर्णय घेतले हे बिनधास्तपणे सांगितले आहे.

१. आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणजे हा आमचा दोष आहे का…

 

२. तुम्ही प्रत्येकवेळी राजीनामे दिले आणि ते पुन्हा मागेही घेतले मग जर राजीनामा द्यायचाच होता तर मग दिलाच का…

 

३. सध्या परिस्थिती अशी आहे की, पुढील निवडणूकांमध्ये देखील मोदीजी विजयी होणार आहेत. अशावेळी आपण काही धोरणात्मक निर्णय घेऊन वाटचाल करण्याची वेळ आली आहे. मात्र तेव्हाही पवार साहेबांनी वेगळीच भूमिका घेतली.

 

४. शिवसेनेला अगोदर जातीवादी पक्ष असे म्हणाले आपल्या त्यांच्यासोबत जायचे नाही. अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आपल्याला भाजपला पाठींबा द्यायचा असे म्हटले. त्यानंतर काय झाले माहिती नाही. मग तेव्हा आपण शिवसेनेसोबतच जायचे. असे म्हटले. आता अचानक असे काय झाले की, पवारांनी शिवसेनेसोबतच जायचे असे सांगितले. मला तर काहीच कळेना.

 

५. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीची जी बैठक झाली त्यामध्ये त्यांनी राजीनामा दिला. तेव्हा माझी भूमिका सांगितली. केंद्रात सोनियाजी जसे नेतृत्व करतात तसे पवार साहेब आपल्याला राज्यात मार्गदर्शन करतील. पण साहेब काही ऐकायला तयार नाहीत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.

 

६. आमच्या विठ्ठलानं आम्हाला आशीर्वाद द्यावेत. अजून किती दिवस तुम्ही कार्यरत राहणार आहात. आम्हाला सांगा. दरवेळी तुम्हीच…मग आम्ही काय करायचं. अशी भूमिका साहेब घेतात.

 

७. माझ्या देवताला विनंती आहे की तुमचा आशीर्वाद आम्हांला द्यावा. दिलीपरावांनी काय चूक केली तिकडे पहिली सभा? मलाही बोलता येतं, उद्या दौरा त्यांनी सुरु केला तर त्यांना उत्तर द्यावं लागेल.

 

८. वरिष्ठांनी थांबले पाहिजे. आम्ही कुठे चुकलो तर सांगा ना मला २०२४ ला मोदींशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी कशी होईल माहीत नाही. मी अनेक अपमान सहन केले गुगली टाकली मला सांगितले एक आणि झालं वेगळे.

 

९. मला प्रत्येकवेळी व्हिलन का करण्यात आले हे कळत नाही. मी तर स्पष्टपणे माझी भूमिका मांडली आहे. पण कुणी का ऐकत नाही हे कळायला मार्ग नाही.

 

१०. आमदारांच्या पत्नीला भेटून त्यांना इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं, अजित पवारांचे काकांवर टीकास्त्र सोडले. तसेच एका आमदाराला तुम्ही कसे निवडून येता हे पाहतो. असं बोललं जातं. अशा शब्दांत पवारांविषयी अजित पवारांनी बोलून दाखवलं.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles