18.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

सासरच्या कुटुंबावर सामूहिक बलात्काराचा खोटा आरोप, महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आपल्या नवऱ्यावर आणि सासरच्या कुटुंबावर सामूहिक बलात्कार आणि मारहाणीचे खोटे आरोप करणाऱ्या महिलेला दिल्ली न्यायालयाने दणका दिला आहे. तक्रारदार महिला आणि तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. तक्रारदार महिलेने 2014मध्ये जनकपुरी पोलीस स्टेशनमध्ये तिच्या नवरा, सासरे आणि नणंदेविरोधात तक्रार दाखल केली होती. महिलेने या तिघांवरोधात सामूहिक बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं सांगून तक्रार दाखल केली होती. तिने केलेल्या आरोपांनुसार, तिच्या सासऱ्याने तिच्यावर नवरा आणि नणंदेच्या उपस्थितीत बलात्कार केला होता. त्यानंतर आपल्याला मारहाण करण्यात आली, असंही तिने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.

 

त्या तक्रारीनंतर या तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. हे प्रकरण सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आलं तेव्हा तक्रारदार महिलेचे वकील या आरोपांना सिद्ध करू शकले नाहीत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आंचल म्हणाल्या की, तक्रारदार महिलेने केलेले आरोप हे जाणूनबुजून लावले गेले आहेत. तक्रारदार महिलेचे वडील हे वकिली करत होते आणि सदर महिला देखील कायद्याची पदवीधर आहे. त्यामुळे आठ वर्षांहून अधिक काळ अशा प्रकारच्या आरोपांचा सामना करावा लागणं म्हणजे काय असतं, हे त्यांना उत्तम प्रकारे माहीत होतं. तरीही त्यांनी असे आरोप केले. पीडितेला आपल्या जबाबांना ग्राह्य धरलं जाईल याची कल्पना होती पण तिने आपल्या वडिलांसह मिळून पुराव्यांबाबत असलेल्या धोरणाचाही गैरफायदा घेतला, असा ठपका ठेवत न्यायालयाने तिच्या सासरच्या मंडळींची निर्दोष मुक्तता केली. तसंच, खोटे आरोप करून न्यायालयाची आणि एकूणच व्यवस्थेची दिशाभूल केल्याप्रकरणी महिला आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles