18.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

“मला मूल हवंय, पतीला तुरुंगातून सोडा”, महिलेची थेट तुरुंग प्रशासनाकडे मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं तुरुंग प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या अर्जाद्वारे तिने तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पतीची पॅरोलवर सुटका करावी, अशी मागणी केली आहे. मला मूल हवं आहे, त्यामुळे पतीला पॅरोलवर बाहेर सोडा, अशी मागणी महिलेनं अर्जाद्वारे केली. संबंधित महिलेचा पती गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, शिवपुरी येथील रहिवासी असलेल्या कुटुंबाने ग्वाल्हेर तुरुंग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी ग्वाल्हेर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दारा सिंह जाटव नावाच्या व्यक्तीला पॅरोलवर सोडण्यात यावं, अशी मागणी केली. दारा सिंह याला लग्नानंतर लगेचच एका खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो ग्वाल्हेर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

कैद्याचे वडील करीम सिंह जाटव यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी जेव्हा त्यांच्या मुलाला (दारा सिंह जाटव) अटक केली, तेव्हा त्यांचं कुटुंब लग्नाचा उत्सवही साजरा करू शकलं नव्हतं. त्यांच्या आजारी पत्नीला एक नातू हवा आहे. त्यासाठी त्यांना त्यांचा मुलगा काही दिवस तुरुंगातून बाहेर हवा आहे.

दरम्यान, या प्रकरणावर भाष्य करतान ग्वाल्हेर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक विदित सिरवैय्या यांनी सांगितलं की, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कोणत्याही कैद्याने दोन वर्षे तुरुंगवास भोगला आणि त्याची तुरुंगातील वागणूक चांगली असेल तर तो कैदी पॅरोल मिळण्यास पात्र असतो. पण पॅरोल मंजूर करण्याचा की नाही? याचा अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles