20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

आसाराम बापूला जामीन मंजूर; पण मुक्काम जेलमध्येच

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सुरतमधील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वंयघोषित संत आसाराम बापू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आसाराम बापू यांचे गेल्या दहा वर्षांपासून जामीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.त्यांना सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सुरतमधील महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामच्या पत्नीसह इतर सहा आरोपी होते. त्यात न्यायालयाने आसारामला दोषी ठरवले. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला. उर्वरित पाच आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्देष मुक्तता केली. आसाराम बापूवर 2013 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये आसाराम बापुला जन्मठेप गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने ठोठावली होती.

या प्रकरणात पीडित महिलेने अहमदाबादच्या मोटेरा येथील आश्रमात वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआरनुसार 2001 ते 2006 दरम्यान अहमदाबादबाहेरील एका आश्रमात महिलेवर अनेकदा बलात्कार झाला होता. तेव्हा ही महिला आसारामच्या आश्रमात राहत होती. पोलिसांनी जुलै 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, या आधी 25 एप्रिल 2018 रोजी जोधपूर न्यायालयाने आसारामला यूपीमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles