-5.8 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

नॉट रिचेबल असणारे धनंजय मुंडे अखेर विधानभवनात दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे अखेर विधानभवनात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीलाही ते उपस्थित रहाणार आहेत.

धनंजय मुंडेंचे दोन्हीही फोन बंद नॉट रिचेबल होते. राष्ट्रवादीच्या आमदारांसह ते मुंबईला निघाले होते. मात्र, यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांसह आता धनंजय मुंडे मंगळवारी सकाळीच मुंबईत दाखल झाले आहेत.

अजित पवार यांनीही महाराष्ट्रातील राजकीय संभाव्य धुमश्चक्रीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राष्ट्रवादीतील सर्वच आमदार हे विधीमंडळातील बैठक आणि इफ्तार पार्टीसाठी हजर रहाणार असल्याचे सांगितले आहे. आपण नॉट रिचेबल असलेल्या कुठल्याही वावड्यांमध्ये तथ्य नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत धनंजय मुंडेंचेही नाव घेतले जात होते. ताज्या अपडेट नुसार, अजित पवारांच्या कार्यालयात धनंजय मुंडे पोहोचले आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles