5.1 C
New York
Tuesday, November 18, 2025

Buy now

spot_img

आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील जवाहर एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

गेल्या आठवड्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोनदा एकाच व्यासपीठावर आले. त्यानिमित्तानं बहिण भावामध्ये जवळीक वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.

सप्ताहाच्या निमित्तानं पकंजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची सभासद म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड

 भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची सभासद म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जवाहर एज्युकेशन सोसायटीची 34 सभासदांसाठी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मत्री आ. धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्याविरोधात एकही अर्ज आला नसल्यानं आ. धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पंकजा मुंडेंविरोधात एक अर्ज

भगवानगडावरील सप्ताहामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंच्या संस्थेवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच इतर जागांवरही तडजोडीचं राजकारण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

हितचिंतक गटातून पंकजा मुंडे यांच्या विरोधात एक अर्ज आलेला आहे. तर इतर 33 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार असल्याचं चित्र दिसत आहे

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles