20.3 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

शेजुळ हल्ला प्रकरणी; आ.सोळंकेच्या ‘पीए’ला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

माजलगाव |

माजलगाव- येथील व्यापारी तथा भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांच्या पी.ए.महादेव सोळंके यास काल सायंकाळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अटक केली होती. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. आज दि.29 रोजी दुपारी 3 वाजता महादेव सोळंके यांना माजलगाव न्यायालयाने 14 दिवसाची (दि.12 एप्रिल) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

माजलगाव शहरातील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर दि.७ मार्च रोजी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात शेजुळ यांनी हा हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून झाला असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार आ.प्रकाश सोळंक, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह ५ ते ६ जनाविरुद्ध 307 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे असून त्यांनी चौकशी साठी महादेव सोळंके यांना केज येथे बोलावले होते. चौकशीत महादेव सोळंके यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढलून आले. त्यामुळे महादेव सोळंके यांना अटक करून माजलगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून आज माजलगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यात त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles