3.6 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

१ एप्रिलपासून देशात विविध नियमांमध्ये बदल होणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

येत्या १ एप्रिलपासून देशात विविध नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. हे बदल प्रामुख्याने तुमचा खर्च वाढविणारे आहेत. त्यात आयकरासंदर्भातील महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. सोबतच नवे वाहन, दागिने, विमा इत्यादी महागणार आहे. या १० प्रमुख नियमांतील बदल जाणून घेऊया.

वाहने महागणार

देशात बीएस-६ नियम लागू होत आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमती वाढतील. होंडा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प यांसारख्या कंपन्यांनी दरवाढीची घोषणाही केली आहे.

दिव्यांगांना यूडीआयडी आवश्यक

१७ सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना विशिष्ट ओळखपत्र (यूडीआयडी) क्रमांक १ एप्रिलपासून आवश्यक करण्यात आला आहे. हा क्रमांक यूडीआयडी पोर्टलवरून मिळविता येतो.

दागिन्यांसाठी ६ अंकी हॉलमार्क

१ एप्रिलपासून ६ अंकी ‘हॉलमार्क अल्फान्यूमरिक युनिक आयडेंटिफिकेशन’ (एचयूआयडी) असलेले दागिनेच ज्वेलर्स विकू शकतील. ग्राहकांकडील जुने हॉलमार्क मात्र वैध असतील.

एलपीजी, सीएनजी, पीएनजी दरात सुधारणा

प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस (एलपीजी), सीएनजी आणि पीएनजीच्या दरात सुधारणा केली जाते. त्यानुसार, १ एप्रिलपासून दर कमी-जास्त होऊ शकतात.

मोठ्या हप्त्यांच्या विमा पाॅलिसींवर कर

लाखांपेक्षा जास्त वार्षिक हप्ता असलेल्या विमा पॉलिसींद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर १ एप्रिलपासून कर लागेल. आतापर्यंत विम्याचे सर्व लाभ करमुक्त होते.

सोने रूपांतरणावर कर नाही

सोन्याला ई-गोल्डमध्ये अथवा ई-गोल्डला सोन्यात रूपांतरित (कन्व्हर्जन) केल्यास आता भांडवली लाभ कर लागणार नाही. सोन्यावर दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागतो.

बँका १५ दिवस बंद

एप्रिलमध्ये डॉ. आंबेडकर जयंती, महावीर जयंती, ईद-उल-फित्र, तसेच शनिवार-रविवार इत्यादी सुट्यांमुळे बँका १५ दिवस बंद राहतील; पण सगळ्याच सुट्या सगळ्या भागात लागू राहणार नाहीत.

डेट फंड करसवलत रद्द

डेट म्युच्युअल फंडावर १ एप्रिलपासून दीर्घकालीन भांडवली लाभ करातील सवलत रद्द करण्यात आली आहे.

‘एनएसई’वरील देवघेव शुल्क होणार रद्द

शेअर बाजारातील रोख इक्विटी व फ्युचर एंड ऑप्शन्स सेगमेंटमधील ६ टक्के देवघेव शुल्क १ एप्रिलपासून मागे घेण्यात येणार आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles